Advertisement

पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी घरासमोरून चोरी* प्रतिनिधी नागेश भटकर

*पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी घरासमोरून चोरी* प्रतिनिधी नागेश भटकर
तालुक्यातील सोनाळा पो.स्टे. येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचे भाड्याने राहत असलेल्या घरासमोर उभे केलेली दुचाकी दि. १७ जुलै च्या रात्री अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला जाते तर इतर सामान्य जनतेचे काय? आशी चर्चा नागारिकांमधून होत आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, फिर्यादी कैलास पर्वता स्पष्ट सांगळे वय ३२ वर्षे व्यवसाय नोकरी रा. सोनाळा ता. संग्रामपूर यांनी सोनाळा पो.स्टे. ला दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची हिरो होंडा शाईन कंपनीची काळा लाल पट्टा असलेली मोटर सायकल क्रमांक एम एच २५ एई ३३४१ किंमत अंदाजे ३० हजार रुपये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी जागेवर दिसून आली नाही. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द १३८/ २०२३ कलम ३७९ भादवी नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सागर भास्कर यांचे आदेशानुसार पो.हे.का. विनोद वानखडे करीत आहेत. सदर परिसरात सीसीटीव्हीचे कॅमेरे लावलेले असून पोलिसांनी फुटेज तपासले असता चोरीचा घटनाक्रम कैद झाला. परंतु चोरट्याचे चेहरे दिसत नाहीत. त्यामुळे चोरट्यांची ओळख पटली नाही. सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये याआधी सुद्धा अनेक नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत. काही तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त आहेत तर काही जणांनी तक्रारच दिलेली नाही. मात्र आता पोलिस कर्मचाऱ्यासचीच दुचाकी चोरी गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.*

Post a Comment

0 Comments