Advertisement

वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईत २० जुलैला धडक मोर्चा* नागेश भटकर विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा: नागेश भटकर

*वंचित बहुजन आघाडीतर्फे मुंबईत २० जुलैला धडक मोर्चा* प्रतिनिधी: नागेश भटकर वंचित बहुजन आघाडीतर्फे २० जुलैला मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाद्वारे महाराष्ट्रातील अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावावर व्हावे, यासह इतरही मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्यासाठी गायरान अतिक्रमण जमिनीच्या पट्टेधारकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे यांनी केले वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात व प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, अशोक सोनोने यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढला जाणार आहे. या साठी येथील वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय जळगांव जामोद येथे गुरुवार दिनांक 13/7/2023 रोजी दुपारी 2 वाजता बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आव्हान कर्ते:- रतनभाऊ नाईक माजी तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे,शहर अध्यक्ष आजम कुरेशी, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे , प्रकाश भिसे,सुपा बांगर, संतोष पवार, आनंद गवई, अमोल तायडे सह इतर पदाधिकारी*

Post a Comment

0 Comments