Advertisement

गोळेगाव येथील नदीमध्ये आढळला अनोळखी कुंजलेला मृतदेह..पोलिसांनी केले मृतदेहावर अंत्यसंस्कार...

प्रतिनिधी:- नागेश भटकर 
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गोळेगाव येथे शेत शिवारातील सुसरी नदीच्या पात्रात दिनांक सात ऑगस्ट रोजी कुंजलेल्या अवस्थेत प्रेत पडलेले आहे अशी माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मिळाली असता पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे व पोलीस उपनिरीक्षक दोडके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना कुंजलेल्या अवस्थेत मृतदेहाचा सापळा मिळून आला.सदर प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याची तक्रार पोलीस पाटील प्रमोद श्रीनाथ यांनी दिनांक 7 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. कुजलेले प्रेत हे सुसरी नदी पात्रातील बंगाली काट्यांमध्ये पडलेले होते. हे कुंजलेले प्रेत पुरुषाचे आहे किंवा स्त्रीचे आहे हे ओळखणे कठीणच होते ज्या ठिकाणी प्रेत सापडले त्यात जागेवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांना बोलावून घटनास्थळीच पंचनामा करून गावापासून दूर असल्याकारणाने त्या ठिकाणी कोणीही इतर व्यक्ती उपस्थित नसल्याने व पोलीस पाटील प्रभारी असल्याकारणाने प्रेतावर अंत्यसंस्कार करणे महत्त्वाचे होते त्यामुळे कुदळ फावडे घेऊन पोलीस उपनिरीक्षक दोडके पोलीस शिपाई स्वप्निल मस्के यांनी मृतदेह पुरविण्यासाठी स्वतःच खड्डा खोदला व त्या अनोळखी प्रेताचे त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले.. हे कुजलेले प्रेत नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत आलेले असावे असे दिसते त्यामुळेच ते बंगाली काट्यात फसलेली दिसले. पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दोडके हे करीत आहेत..

Post a Comment

0 Comments