मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:-श्री क्षेत्र धोपेश्वर येथे पूर्णा नदी तून अवैध वाळू उपसा व नदीचा संपूर्ण घाट फोडून काढल्यामुळे भाविक भक्तांची, परिसरातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात नाराजी होती हा अवैध वाळू उपसा व घाट तोडल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करून वाळू उपसा बंद करावा या मागणीचे धोपेश्वर संस्थान व परिसरातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 पासून श्रीक्षेत्र धोपेश्वर संस्थान येथील मंदिरावर हरीश रावळ, तेजराव रायपुरे, रवींद्र रायपुरे, भारत झाल्टे, महेंद्र मोडक, प्रभाकर रायपुरे, प्रमोद गावंडे हे आमरण उपोषणाला हे बसले आहे जोपर्यंत अवैध उपसा बंद होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील अशी आक्रमक भूमिका सगळ्यांनी घेतली आहे त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप युवा तालुकाप्रमुख अमोल बावस्कार यांनी उपोषणास प्रहार जनशक्ती पक्षचा पाठिंबा दर्शविला.
0 Comments