Advertisement

इंटरनेट ऑफ थिंग्स ची सहावी कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी नागेश भटकर 
 दि. १३/८/२०२३ सन्मान परिवार जळगाव जामोद च्या सहकार्यातून पंचायत समिती जळगाव जामोद तर्फे जि प शाळेत करिता राबविण्यात येणाऱ्या इंटरनेट आॕफ थिंग्स या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर आधारित उपक्रमाची शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सहावी कार्यशाळा दिनांक 13 ऑगस्ट 2023 ला संपन्न झाली.स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये आयोजित या उपक्रमाची सहाव्या कार्यशाळेला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डोईफोडे साहेब व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्याकरिता खास पुण्याहून आलेले तुषार गांधी उपस्थित होते. डोईफोडे साहेबांनी उपक्रमाकरिता शुभेच्छा देत उपक्रमाकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आजच्या कार्यशाळेत प्रोग्रामिंग रन करत प्रत्यक्ष कृती करून घेतल्या गेल्या. भविष्यातील मेक ईन इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी सन्मान परिवारातर्फे प्रायोगिक तत्त्वावर आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम महाराष्ट्रा करीता प्रदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी दिली. आजच्या कार्यशाळेला नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री डोईफोडे साहेब, पुण्याहून आलेले तुषार गांधी, सन्मान परिवाराचे मार्गदर्शक श्री श्याम फाफट सर , सौ. चंचल गांधी मॅडम, सेदाणी मॕडम, डाॕ महादेव सातव सर व इतर सर्व शिक्षक तसेच सन्मान परिवाराचे अजिंक्य टापरे , आशिष राजपूत, राजेश कोकाटे व इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments