Advertisement

आयटीआय मध्ये शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी 
मोताळा : येथील आयटीआय कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चिखली तालुक्यातील अंबाशी येथील एका २१ वर्षीय युवकाने खोलीतील छताच्या पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली ही घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव आदीत्य वसंतराव देशमुख असे आहे. आदीत्य देशमुख हा मोताळा येथील बसस्टॅण्ड मागील परिसरातील सुभाष कुटे यांच्या रुममध्ये भाड्याने राहत होता. तो येथील आयटीआय कॉलेजमध्ये शिकत होता. १० सप्टेंबर रोजी आदीत्यने सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments