Advertisement

लहुजी शक्ती सेनेचे तहसिलदार यांच्या मार्फत ग्रुहमंत्र्याना निवेदन

प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगांव जामोद:- सातारा जिह्यातील पानवड या गावात मातंग समाजातील महिलेला विवस्त्र करून जबर मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून कडक शिक्षा देण्या बाबत आज दिनांक ०१/०९/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले कि सातारा जिल्ह्यातील मान तालुका येथिल पानवड या गावात मातंग समाजातील एक महिलेला क्षुल्लक कारणावरून भर चौकात विवस्त्र करून गावगुंडांनी बेदम मारहाण केली या गावगुंडांना अटक करून कठोर शासन करण्यात यावे आणि त्या आरोपींवर ॲट्रॉसिटी एक नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्या महिलेला पोलीस संरक्षण देण्यात यावे त्या महिलेला उच्च दर्जाचे उपचार देण्यात यावा व पिडित महिलेला आर्थिक मदत सुद्धा देण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेना जळगांव जामोद तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे
 अन्यथा लोकशाही मार्गाने लहुजी शक्ती सेना जळगांव जामोद तीव्र आंदोलन छेडण्यात येईल 
असा इशारा देण्यात आला यावेळी लहुजी शक्ती सेनेचे तालुकाप्रमुख कैलास डाखोरे, तालुका महासचिव महादेव खरात, तालुका उपाध्यक्ष दिपक रनशिंगे, सामाजिक कार्यकर्ते जंगलुभाऊ निकाळजे,उत्तम खरात, शंकर रनशिंगे, भास्कर भगत, संतोष पवार, गुलाबराव आठवले, सुनिलभाऊ बोदडे, ज्ञानेश्वर कोकाटे,संपत जुमळे, अमोल भालेराव, गजानन डाखोरे यासह इतर कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत

Post a Comment

0 Comments