Advertisement

हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिप्रेत असणार कार्य सर्वांना मिळून करावयाचे आहे-...


नवनियुक्त पक्ष निरीक्षक विजय देशमुख
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:- हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिप्रेत असणार कार्य आपणा सर्वांना मिळून करावयाचे आहे. येत्या काळात शिवदूत अभियान राबवून रावेर लोकसभा मतदारसंघात पक्षाला बळकटी द्यावयाची आहे त्या अनुषंगाने लवकरच पदाधिकाऱ्यांची नियोजित बैठक घेऊन विस्तृत माहिती देऊ असा अभिप्राय रावेर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचे नवनियुक्त पक्ष निरीक्षक विजय देशमुख यांनी व्यक्त केला.मुंबई येथून नवनियुक्त पक्ष निरीक्षक विजय देशमुख आज १६ सप्टेंबर रोजी जळगाव येथे आले होते. दरम्यान जळगावचे शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, मलकापूरचे शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत शिवसेना पक्ष कसा अधिक पणे बळकट केला जाईल, संघटना वाढविण्याच्या दृष्टीने काय काय प्रयत्न करता येईल? तसेच येत्या काळात शिवदूत अभियान यशस्वी करण्याकरिता काय केले पाहिजे यासंदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांशी विजय देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी बुलढाणा व जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा धावता आढावा सुद्धा घेण्यात आला. वासुदेव पाटील व ओमसिंग राजपूत यांनी पक्ष वाढीकरिता सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती विशद केली. तर विजय साठे यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या पक्षकार्याची माहिती कथन केली. यावेळी नवनियुक्त पक्ष निरीक्षक विजय देशमुख यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments