Advertisement

शांतता समितीच्या वतीने आगामी येणाऱ्या गणेशोत्सव सना निमित्त शांतता समितीच्या बैठक संपन्न.

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:- आगामी येणाऱ्या गणेश उत्सव सणांमध्ये अतिरेक न करता गुण्यागोविंदाने व शांततेने सण साजरे करा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मध्ये केले.शांतता समितीच्या वतीने आगामी येणाऱ्या गणेशोत्सव सना निमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन महेश भवन येथे आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.या बैठकीला अध्यक्ष म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार आर यु सुरडकर, एसडीएम मनोज देशमुख, उपविभागीय अधिकारी गवळी, पो.नी. अशोक रत्नापारखी, मुख्य अधिकारी आशिष बोबडे होते. तर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी शांततेमध्ये सण साजरे करा असे आवाहन केले . प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले एचडीएम मनोज देशमुख यांनी पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश उत्सवामध्ये गुलाल न उधळता फुलांच्या पाकळ्या वापरावे तसेच डीजे वाजवताना शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे 75 डीसेबल च्या खालीच आवाज असला पाहिजे जेणेकरून स्थानिक घटकांना त्यांचा त्रास होणार नाही असे आव्हान एसडीएम मनोज देशमुख यांनी केले. पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी आपल्या भाषणांमधून म्हटले की मलकापूर शहरांमध्ये आतापर्यंत जेवढे सण माझ्या कारकीर्दीत साजरे झाले तेवढे सन सर्वांनी गुण्यागोविंदाने साजरे केले व आगामी येणारा गणेशोत्सव सुद्धा गुण्यागोविंदानेच साजरा होईल असे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले. शांतता समितीचे सदस्य दामोदर शर्मा, अशांतभाई वानखेडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व आगामी येणारा सण शांततेने साजरा करा असे आव्हान सुद्धा यावेळी सर्व मंडळाच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी पो.नी. कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हसाये, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार, पीएसआय सुरेश रोकडे, शांतता समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच सर्व मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य व शहरातील सर्व सुशिक्षित व सुज्ञ नागरिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments