Advertisement

शहरात निघाली भव्य दिव्य अशी कावड शोभायात्रा..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज सार्वजनिक कावड यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य अशा कावड शोभायात्रेत जवळपास 120 फूट लांबीची कावड तसेच 20 फूट उंचीची शिवप्रतिमा उभारण्यात आली होती या सर्व देखाव्याने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.मलकापूर शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भव्य दिव्य अशा सार्वजनिक कावड यात्रेचे आयोजन करण्यात येत असते, ही भव्य दिव्य अशी कावड यात्रा मलकापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धुपेश्वर येथून असंख्य कावड धारी ही कावड घेऊन मोठ्या सर्दीने व उत्साहाने मलकापूर येथे दाखल होत असतात, ही भव्य दिव्य कावड यात्रा शहरातील पंतनगर, छत्रपती शिवाजीनगर, चार खांबा चौक, तहसील चौक, हनुमान चौक, निमवाडी चौक, मार्गे निघाली होती मलकापूर शहरात या कावड यात्रेचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होऊन श्री गंगेश्वर संस्थान येथे या कावड यात्रेचा समारोप करण्यात आला, शहरात निघणाऱ्या या भव्यदिव्य कावड यात्रेतील देखावे पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर छत्रपती शिवाजीनगर सार्वजनिक कावड उत्सव समितीच्या वतीने या भव्य दिव्य अशा कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments