Advertisement

चोहोट्टा बाजार येथे शिवभक्तांचा जल्लोष हर हर महादेव गजराने दुमदुमून गेला चोहोट्टा परीसरमहर्षी वाल्मिकी सेना ,शिवसंभा प्रतिष्ठान या दोन कावड चा सहभाग



चोहोट्टा (बा) प्रतिनिधी :- अमोल राणे :- 
हजारो महादेव भक्त दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पालखी कावड द्वारे महादेव मंदिर येथे गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक घालतात आणि शिवभक्ती उत्सव साजरा करतात. यावर्षी देखील कावडींच्या सहभागातून चोहोट्टा नगरीत महादेव भक्तीचा हा भव्य उत्सव साजरा करण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदाही कावड यात्रा उत्साहाच्या वातावरणात जल्लोष साजरा करण्यात आला. चोहोट्टा बाजार येथील श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शिवभक्त महर्षी वाल्मिकी सेना व शिवसंभा प्रतिष्ठान या मंडळाच्या कावड गांधीग्राम येथून पुर्णा नदीचे पवित्र जल खांद्यावर कावड घेऊन चोहोट्टा येथे दाखल होतात त्यांच्या स्वागतासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक उपस्थित असतात ,महर्षी वाल्मिकी चौकात येणाऱ्या प्रत्येक कावडला पुष्पमाला अर्पण करून महर्षी वाल्मिकी चौकाचे पूजन करण्यात येते त्यानंतर सहभागी सर्व कावडदारी शिवभक्तांना अल्पोपहार ,चहा, दूध केळी फळांचा वाटप केला जातो, यावेळी पंचक्रोशीतील राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असतात, शिवभक्तांच्या संरक्षणार्थ गांधीग्राम पासून चोहोट्टा बाजार पर्यंत दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी यांचा चोक बंदोबस्त होता.

Post a Comment

0 Comments