Advertisement

श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी .


शेगाव प्रतिनिधी
 श्री.संत सेना महाराज सेवाभावी संस्थेच्या वतिने उत्साहाने साजरी करण्यात आली. वारकरी सांप्रदायाच्या विचारांचा पुरस्कार करत. संतांचे विचार आजच्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी "श्रीं" संत सेना महाराज यांची ५७५ पुण्यतिथी साजरी करण्यात आली.दि.११ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ह.भ.प बाजीराव अरबट महाराज यांचे किर्तनातुन संत परंपरा व संस्कृतीचे निरुपम करण्यात आले. या वेळी वारकरी मंडळींचा सहभाग होता. "श्रीं" चे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या पुण्यतिथी अनुषंगाने नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी चा 'नाभिक गुणवंत गौरव पुरस्कार २०२३' देवुन सन्मान करण्यात आला. ह.भ.प.श्री. विजय महाराज हंतोडे,अतुल आंबेकर, तसेच सौ.अंकिता आकाश खाकरे यांची BSF मध्ये निवड झाल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच शिवसेना (शिंदे गट) चे बुलढाणा खासदार श्री.प्रतापराव जाधव  यांचे विशेष प्रयत्नांतुन वैशिष्ट्येपुर्ण योजने अंतर्गत २५ लक्ष रुपयांच्या सभागृहाचे भुमीपुजन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना (शिंदे गटाचे) युवासेना जिल्हाप्रमुख श्री.ऋषीकेश प्रतापराव जाधव हे प्रमुख उदघाटक होते. त्यांचे हस्ते भुमिपुज करण्यातआले. या सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.शांताराम दाणे, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेवराव तायडे शेगांव तालुकाप्रमुख श्री.रामेश्वर थारकर,युवासेना तालुकाप्रमुख उमेश शेळके, श्री.मोहन पाटील,श्री.शशिकांत पुंडकर,श्री.मयुरदादा पाटिल, संस्थेचे अध्यक्ष श्री.गणेशराव अंबुसकर,सचिव श्री. प्रकाश इंगळे,श्री.नंदकिशोर अमृतकार, राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे बुलढाणा अध्यक्ष श्री.ज्ञानदेवराव तायडे,श्री.गणेशराव अमृतकर,श्री.सुनिल अहिरकर, श्री.शरद पिंपळकार, श्री.श्याम पांडे, सौ.गौरीताई वानखडे, श्री.मनोहर अंबुसकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्राचे मा.मंत्री तथा विद्यमान आ.डाॕ.संजय कुटे यांनी "श्रीं" पुजन करुन अभिवादन केले, यांचे सोबत भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये श्री.पांडुरंग बुच,नगरसेवक श्री. पवन महाराज शर्मा,श्री.गजाननराव जवंजाळ,भाजपा शहराध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरअप्पा खारखे, श्री. कमलाकर चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव श्री.रामविजय बुरुंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीधरदादा पाटील, आदी मान्यवरांसह विविध पक्ष व सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत. पत्रकार श्री.अमर बोरसे,प्रदिप सन्नासे यांनी वृत्तसंकलनाची जबाबदारी स्विकारली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.संतोष कळमकार यांनी केले तर श्री.जगन्नाथ गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. या पुण्यतिथी सोहळ्याला असंख्य नाभिक समाज बांधवांची उपस्थिती होती.महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments