Advertisement

केशव विद्यालयच्या मुलींची विभागीय स्पर्धेकरिता निवड

प्रतिनिधी नागेश भटकर 
 सोमवारी मलकापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत येथील केशव माधव विद्यालयाच्या चवदा वर्षा आतील विद्यार्थींनिंनी पारितोषिक मिळवून विभागीय स्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे 
*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत शालेय जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन तालुका क्रिडा संकुल मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे दि.18/9/2023 ला करण्यात आले होते.सदर स्पर्धेत केशव विद्यालय जळगांव जामोद च्या १४ वर्षाखालील मुली कु.आर्या अजय वानखेडे वर्ग 6 वा कु.शरयू रामदास रेवस्कार वर्ग 7 वायांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय क्रीडास्पर्धेकरिता आपली निवड निश्चित केली.सदर मुलींना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली कुलकर्णी व सर्व शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्याअसून मुलींना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.जय पारस्कर सर ,जेबीसीचे संचालक श्री.अजिंक्य टापरे सर व सॉफ्टटेनिस असोसिएशनचे सचिव श्री.विजय पळसकर सर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments