मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर :शहर पोलिस स्टेशन ला नवीन आलेले पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी मलकापूर शहरातील मुख्य मार्गावर पद संचलन करून वाहने मार्गावर कुठे ही न लावता सुरक्षित ठिकाणी लावावी व शासकीय नियमाचे पालन करावे या करिता पद संचालन मोहीम चालवली आहे मलकापूर शहरातील मुख्य चौकातून संचालन करते वेळी मार्गावर उभी असलेली वाहने काढायला लावली आणि मुख्य तहसिल चौक हनुमान चौकामध्ये ऑटो रिक्षा, दुचाकी वाहने मार्गावर असल्यामुळे वाहातुकीची कोंडी होते व पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो तसेच सद्या स्थिती पाहता सणा सुधी चे दिवस असून सद्या गणेश उत्सव हा उत्साहात साजरा करत असताना मलकापूर शहरात अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसून येताच नव युक्त पोलिस निरिक्षक यांनी वाहतुक नियमाचे पालन होत नसल्याने आज रोजी सायंकाळी पद संचालन करून नागरिकांना फुटपाथ वर चालण्याचे निर्देश दिले तसेच वाहन चालकांनी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करून शासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे सागितले यावेळी मलकापूर शहर पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी ए. पी. आय. करुणशिल तायडे, पो. हे. कॉ. सुनील नाफडे, पो. कॉ. आनंद माने, पो. कॉ. ईश्वर वाघ, महेश चोपडे, गोपाल तारुळकर, संतोष कुमावत, शे आसिफ, मंगेश चरखे, मनोज उमाळे, पंजाबराव शेळके, प्रदीप राठोड सह पोलिस अधिकारी व कर्मचारी पद संचालनात उपस्थित होते
0 Comments