Advertisement

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला गांजा जप्त ! साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त !


प्रतिनिधी नागेश भटकर 
सध्या तरुण असेल वयोवृद्ध नागरिक असतील
ते मोठ्या प्रमाणामध्ये नशेच्या आहारी गेले आहेत 'दारूचे प्रमाण व त्याचबरोबर गांजा पिणाऱ्याचे प्रमाण सुद्धा अधिक आहे . त्यामुळे ठिकठिकाणी गांजा व गांजाची तस्करी होते म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची तीक्ष्ण नजर
 होतीच.दरम्यान देऊळगाव राजा पोलीस ठाणे हद्दीत १० सप्टेंबर रोजी २४ किलो ३०० ग्राम गांजा सह ३ लाख ४९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.किसन आनंदा मंडळकर 50 वर्षे रा. _संजयनगर, देऊळगांव राजा ता. दे. राजा अ_ से आरोपीचे नाव आहे.आणखीन काही गांजा त्यांच्यामुळे जप्त होऊ शकतो 'जप्त झालेल्या गांजामुळे जिल्ह्यामध्ये गांजा तस्करीच मोठ जाळ असण्याची शक्यता आहे '

Post a Comment

0 Comments