आज दिनांक 11.09.2023 रोजी
27, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे कृषि महाविद्यालय, स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद येथे राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक विभाग, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान व नवमतदार नोंदणी करीता एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन जळगांव जामोद येथील विद्यमान उपविभागीय अधिकारी, श्री.शैलेष काळे तसेच तहसीलदार, कु.शितल सोलाट यांचे मार्गदर्शना खाली घेण्यात आला. त्यामध्ये जवळपास 50 नवमतदार यांची नोंदणी करण्यात आली. शिबिर उत्साहात पार पाडण्यासाठी तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, रा. से. यो., कार्यक्रम अधिकारी तसेच निवडणूक विभागातर्फे श्री.सत्यविजय जाधव आणि श्री.नितीन वाघ यांचे सहकार्य लाभले.
0 Comments