शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख शरद बुंदे शिवसेनेच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग,अकोला यांना निवेदन अकोला : अकोट अकोला मार्गाचे काम मागिल सात ते आठ वर्षांपासून कासवगतीने प्रगतीपथावर आहे. त्यामुळे नागरिकांना नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.वाहनांच्या दुरुस्ती पासुन तर दवाखान्याच्या खर्चापर्यत वाढ झाली आहे. चोहोट्टा बाजार हि जवळपास चाळीस खेड्यातील लोकांची मुख्य बाजारपेठ आहे. दैनंदिन कामकाजासाठी दररोज या खेड्यातील लोकांना चोहोट्टा बाजार येथे यावे लागत आहे किराणा माल,शेतिपयोगी अवजारे, कृषी ,दवाखाना, मेडिकल, भाजीपाला, दैनंदिन किरकोळ विक्रेते या सर्वच गोष्टी चोहोट्टा बाजार येथे याच रोडवर असल्याने वाहनांची, लोकांच्या गर्दीमुळे हा मुख्य रस्ता कायम तसेच या रोडवरून हजारो विद्यार्थी ये जा करित असतात त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.अकोट अकोला रोडचे नवनिर्मानाचे काम चालू असल्यापासून रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायम दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची आवश्यकता सार्वजनिक बांधकाम विभागाला कदाचीत वाटली नसेल, परंतू नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल वारंवार तक्रारी येत असल्याने चोहोट्टा बाजार येथील मुख्य रस्ता पाचबोले यांच्या दुकान पासुन ते जिल्हा परिषद शाळा रोड पर्यत तात्काळ दुरुस्त करन्याची मागणी निवेदनातून शिवसेनेच्या वतीने करण्यात आली
निवेदन पत्राची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिल्यावर येत्या ८ दिवसात न घेतल्यास आमदार नितीन बाप्पू देशमुख, माजी आमदार संजय भाऊ गावंडे, शिवसेना ( ऊ.बा.ठा.) जिल्हा प्रमुख गोपाल भाऊ दातकर,दिलिप भाऊ बोचे जिल्हा उपप्रमुख शिवसेना,ब्रम्हकुमार पांडे अकोट तालुका प्रमुख, गोपाल भाऊ म्हैसने उप तालुका प्रमुख शिवसेना ( ऊ.बा.ठा ) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शरद भिमरावजी बुंदे जिल्हा उपप्रमुख शिक्षक सेना शिवसेना ( ऊ.बा.ठा. ) यांच्या वतीने देण्यात आला...आंदोलनात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहिल अशी मागणी सुद्धा निवेदन मध्ये करण्यात आली उपरोल्लेखित रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्याची कार्यवाही करण्यात
यावी असे शरद भिमरावजी बुंदे ऊपजिल्हाप्रमुख शिक्षक सेना,शिवसेना ( ऊ.बा.ठा.) अकोला यांनी केली आहे...गोपाल भाऊ दातकर जिल्हाप्रमुख शिवसेना तथा जि. प.सदस्य अकोला यांनी पाठपुरावा करत ,कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग अमरावती यांना संपर्क करुन चोहोट्टा बाजार येथील पाचबोले कॉम्प्लेक्स समोरील गड्डे मुरूम टाकून काँक्रीटीकरण कामाची लवकरात लवकर सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देताच, कार्यकारी अभियंता यांनी कामाला लवकरच सुरुवात करण्याचे आश्वासन दिले........
0 Comments