डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित स्वा. विर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय व स्वा. विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगांव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत चावरा इलोरा येथे दिनांक २९ सप्टेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. चर्चा सत्राचा विषय रबी पिकांची पूर्व तयारी व तसेच सध्येची असलेली पिकांची स्थिती.
या कार्यक्रमा मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री शशांक दाते सर ( कृषी विज्ञान केंद्र, जळगांव जामोद ) यांनी पीक पद्धती बद्दल, कपाशी पीकाबद्दलची सध्याच्या अवस्थेतील परिस्थितीची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच मर रोगाबद्दल माहिती दिली. तसेच रबी पिकांसाठी बावीसटिन, थायरम यांची बीजप्रक्रियेचा सल्ला शेतकऱ्यांना दिला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश गवई सर तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल तायडे सर व प्रा आटोळे सर आणि इलोरा गावचे पोलीस पाटील राजेंद्र तिजारे व चावरा गावचे पोलिस पाटील गोविंदा लाधे आदी मान्यवर उस्थितीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन हे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रितेश वानखडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. जिव्हेश साळी यांच्या मार्गर्शनाखाली यशस्वीरित्या सम्पन्न झाला.
0 Comments