Advertisement

हिवरखेड येथे श्रीगणेश मंडळाच्या रथाचे पूजन व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या सत्काराचे

हिवरखेड (प्रतिनिधी) बाळासाहेब नेरकर 
एकता संदेश गणेशोत्सव मंडळ व प्रेस क्लब हिवरखेड च्या संयुक्त विद्यमानाने गावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या रथाचे पूजन करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्काराचे आयोजन राजधानी चौक येथे करण्यात आहे होते. यात प्रथम ११५ वर्षापासून श्री.गणेश उत्सवाची परंपरा जपणाऱ्या मानाचा गणपतीचे पूजन पोलीस पाटील प्रकाश गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील सर्व श्रीगणेश मंडळाच्या पदाधिकारी यांचाही सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून साप्रदायीक वारकरी भजनाचे अध्यक्ष शंकरराव देशमूख, अकोट विभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, गणेश पाचपोर, उपस्थित पोलीस कर्मचारी बंधू यांचाही सत्कार आयोजकांनी केला. यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गिऱ्हे, राजेंद्र भोपळे पञकार केशव कोरडे बाळासाहेब नेरकर रितेश टीलावत,जितु लाखोटीया,राजू खान,शफाकत भाई, सतीश इंगळे,प्रा संतोष राऊत स्नेहल भोपळे, , गोवर्धन गावंडे, राजेश अस्वार,सागर राऊत, जमीरोद्दीन, मनोज भगत, फारुक
 सौदागर,डॉ.प्रशांत इंगळे,प्रकाश खोब्रागडे, प्रशांत भोपळे,उमेश कोल्हे, शहजाद खान, डॉ.मुद्द्शीर अली,विनोद भोपळे,गजानन खिरोडकर, मोईसोद्दीन, रशीद बारदानेवाले, प्रशांत कोल्हे,गजानन गावंडे, ज्ञानदेव भटकर,सुनील धूरदेव गावातील नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते. गावात सामाजिक बांधिलकी जपून उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन केल्या जात असते. या उत्सवात सर्व धर्मीय लोक सहभागी होऊन सामाजिक एकता जपण्यास हातभार लागतो, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे आपल्या संचालनातून प्रा.संतोषकुमार राऊत यांनी माहिती दिली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गणेश अग्रवाल, किरण सेदानी, मनीष भुडके,गजानन दाभाडे,सुनील बजाज,महेंद्र कराळे, मोहन सोनोने,बलराज गावंडे,ज्ञानेश्वर गावंडे,संजय मानके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments