शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा मनविसेने दिले विभागीय नियंत्रक बुलडाणा यांना स्मरणपत्र दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल- मनविसेचा इशारा*
नांदुरा: तालुक्यातील भोटा येथे खामगाव आगाराची बससेवा हि नियमितपणे सुरू आहे. परंतु भोटा येथून जवळच असलेल्या कठोरा येथे शेगांव आगाराची बससेवा सुरू आहे सदर बससेवेचा थांबा हा भोटा पर्यंत वाढविण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिनांक १८ जुलै २०२३ रोजी म.रा.प.म.विभागीय नियंत्रक, बुलडाणा यांना निवेदन दिले होते. त्या आधीही दिनांक १४ जुलै रोजी शेगांव आगारास बसचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्यासाठी निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनाची दखल न घेतल्याने मनविसेने विभागीय नियंत्रक यांना आज दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर,व मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी स्मरणपत्र दिले असून सदर स्मरणपत्राची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याच्या आशयाचे स्मरणपत्र दिले आहे.
सविस्तर बातमी अशी की भोटा येथे खामगाव आगाराची बससेवा सद्यस्थितीत सुरू आहे परंतु बर्याचदा प्रवांशांची संख्या जास्त असल्याने बसेस मध्ये विद्यार्थ्यांना जागाच नसते त्यामुळे येथील पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते नाहीतर खाजगी वाहनाने प्रवास करून अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागतं आहे. परंतु भोटा येथूनच जवळच असलेल्या सुमारे ०४ किलोमीटर अंतरावर असलेल्या कठोरा येथे शेगांव आगाराची बससेवा सुरू आहे. सदर बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविल्यास विद्यार्थी,प्रवाशी यांच्या सोबतच एस टी महामंडळाचे उत्पन्न देखील वाढणार आहे.परंतु असे असले तरी एसटी महामंडळाने या सर्व बाजू तपासून पाहून सदर शेगांव ते कठोरा बससेवेचा थांबा भोटा पर्यंत वाढविण्याची सद्या गरज आहे.
यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेना अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे त्यासाठी शेगांव आगारास, त्यानंतर विभागीय नियंत्रक बुलडाणा यांना देखील निवेदन दिले होते.याचा सर्व पाठपुरावा मनसेकडून अनेकदा करून देखील एस. टी. महामंडळाकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसल्याने मनविसेने आता संतप्त भुमिका घेत थेट एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यांना स्मरणपत्र दिले असून सदर स्मरणपत्राची दखल जर नाही घेतली तर मनविसे यानंतर मनसे स्टाईलने म.रा.प.म.विभागिय नियंत्रक यांच्या कार्यालयातच आंदोलन करणार असल्याची माहिती मनविसेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सदर निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बुलडाणा उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या सह्या आहेत.
0 Comments