मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर अंगणवाडी कार्यक्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस पदभरतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करुन गैरप्रकारे पदभरती करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी आज १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प बुलडाणा यांचे अधिनस्थ असलेल्या मलकापूर अंगणवाडी कार्यक्षेत्रातील रिक्त मानधनी मदतनीस या पदांची भरती प्रक्रिया नुकतीच पार पाडली. या प्रक्रियेत मलकापूर कार्यक्षेत्रातील १५ रिक्त जागांची पदभरती करण्यात आली. या पदभरतीत गैर प्रकार झाल्याचे दिसत आहे. पदभरतीत उमेदवारांना वास्तव्याची अट होती. त्यामध्ये उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असावा. व स्थानिक रहिवासी बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने सदर पुरावा उमेदवारांनी स्थानिक नगर परिषदेमधून मिळविलेला आहे. असे असतांना पात्र उमेदवारांच्या यादीत स्थानिक रहिवाशी उमेदवारा व्यतिरिक्त अर्जदार उमेदवारांचा पात्र यादीत समावेश करण्यात आल्याचे दिसत आहे. तरी या प्रकरणी मलकापुर कार्यक्षेत्रातील पात्र उमेदवाराचे अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कागदपत्रांची पुर्नतपासणी करण्यात यावी. तपासणी दरम्यान जर चुकीच्या पध्दतीने गैरप्रकारे शहर बाहेरील वास्तव्य असलेल्या उमेदवारांचा पात्र यादीत शहरातील वास्तव्य दाखवून समावेश केलेला निघाल्यास तो कोणत्या कागदपत्राच्या आधारे करण्यात आला ही बाब स्पष्ट होईल. त्यामुळे मलकापूर कार्यक्षेत्रात पात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी होणे गरजेचे आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पात्र यादीत गैरप्रकारे उमेदवारांचा समावेश करणाऱ्या संबंधीत दोषी अधिकाऱ्याविरुध्द तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी केली असून सदर निवेदनाची प्रतिलिपी शिवसेना नेते तथा खासदार प्रतापराव जाधव यांना उचित माहिती व कार्यवाहीस्तव सादर करण्यात आली आहे.
0 Comments