Advertisement

जळगांव जामोद बॅडमिंटन क्लबच्या मुलींची विभागीय स्पर्धेकरिता निवड

प्रतिनिधी नागेश भटकर
जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन क्रिडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन दि १३/०९/२०२३वयोगट १४ वर्ष मुली स्थळ :- इंडोर स्पोर्ट्स फेसिलिटी सेंटर जनता कला व वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे करण्यात आले होते .सदर जिल्हास्तरीय शालेय स्पधेमध्ये मुलींच्या 14 वर्ष वयोगटातून केशव विद्यामंदिर जळगांव जामोदच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकवित विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत आपली निवड निश्चित केली. सदर 14 वर्ष वयोगटातील स्पर्धेत सहभागी मुली 1)कु.शरयू रामदास रेवस्कार वर्ग 7वा
2)कु. रेवा अमर पाचपोर वर्ग 7वा3)कु.शची हरिदास पांडे वर्ग 7वा 4)कु.तेजस्विनी महादेव माठे वर्ग 7वा
5)कु. आर्या अजय वानखेडे वर्ग 6वा सदर मुलींना क्रीडा शिक्षक म्हणून श्री. जय पारस्कर सर व जळगांव बॅडमिंटन क्लबचे संचालक श्री. अजिंक्यदादा टापरे आणि ए.डी.बॅडमिंटन पुणेचे संचालक श्री. आशिष दामोदर यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक करून मुलींना विभागीय क्रीडा स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. सर्वत्र केशव विद्या मंदिरच्या मुलींचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments