Advertisement

मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत रूट मार्च काढण्यात आल

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहर आज दिनांक 25 09 23 रोजी पोलीस स्टेशन मलकापूर शहरांतर्गत गणपती विसर्जन मिरवणुकी संबंधाने माननीय श्री अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांचे मार्गदर्शनात रूट मार्च आयोजन करण्यात आले. मा एस डी पी ओ मलकापूर, पोलीस निरीक्षक मलकापूर शहर, पोलीस निरीक्षक आरटीपीएस अकोला, असे 14 पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन मलकापूर शहर, मलकापूर ग्रामीण, एमआयडीसी, पोलीस स्टेशन नांदुरा, पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार तसेच होमगार्ड एस आर पी एफ, आर सी पी प्लाटून खामगाव व मलकापूर
 इत्यादी असे 151 पोलीस अमलदार रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते. रूट मार्च पोलीस स्टेशन मलकापूर शहर, तहसील चौक, चार खंबा चौक, आठवडी बाजार, निमवाडी चौक, गांधी चौक, छोटा बाजार चौकी, नसवाला चौक, लखानी चौक, बाजीप्रभू नगर, संताजी मंगल कार्यालय, अब्दुल हमीद चौक, चांडक विद्यालय, गाडगे महाराज टी पॉइंट, हनुमान चौक, तहसील चौक व पुन्हा पोलीस स्टेशन अशा रस्त्याने काढण्यात आला. 16.00 वा सुरू होऊन 17.00 वा संपला. शांतता राहिली.

Post a Comment

0 Comments