तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,उपसभापती, सहसचिव यांना 1 लाख रुपयेची लाच घेतांना अटक देवानंद खिरकर - अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल इंगळे,उपसभापती प्रदीप मधुकर ढोले,सचिव सुरेश सोनोने यांना 1 लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.ही कारवाई अकोला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.ही कारवाई झाल्याने अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.याबाबत थोडक्यात माहिती अशी की,तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तक्रारदार यांचे 5 लाखाचे बिल गेल्या चार ते पाच वर्षापासुन थकीत होते.नमूद देयकांची रक्कम काढण्यासाठी वर नमूद आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी केली होती.लाचेची रक्कम देण्याची नसल्याने तक्रारदार यांनीं लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अकोला त्यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानुसार अकोला लाचालूपचत प्रतिबधक विभागाने सर्व बाजूची पडताळणी करुन दि.25 सप्टेंबर रोजी सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली.त्यांच्या विरोधात तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना अटक करण्यात् आली आहे.ही कारवाई अकोला लाचलूचपत प्रतिबंधक अकोला विभागाचे पोलिस उपाअधिक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनााखाली त्यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments