मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुक्यातील हरसोडा व काळेगाव येथील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे यांच्या मार्गदर्शना होऊन हरसोडा या गावात आज दिनांक 30 9 2023 रोजी बैठक संपन्न झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून पाच टक्के राखीव निधी दिव्यांगाना दिला जात असतो मात्र मिळाल्या माहितीनुसार आज पर्यंत दिव्यांगाचा राखीव निधी सदर ग्रामपंचायतीने दिल्या नसल्याचे कळते या अनुषंगाने संस्थापक अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली असता येत्या लवकरच दिव्यांगांना राखीव निधी प्रदान करण्यात येणार असल्याच्या आश्वासन दिले तदनंतर हो घातलेल्या बैठकी त दोन्हीही गावचे शाखाप्रमुख गुणवंत झाल्टे , तसेच महिला अध्यक्ष सुरेखाबाई झाल्टे उपाध्यक्ष कविता झाल्टे सचिव मुक्तता बाई चांदेलकर उपाध्यक्ष भास्कर रायपुरे सचिव शालिग्राम सोनवणे सहसचिव दिनकर इंगळे कोषाध्यक्ष संदीप मोरे तसेच काळेगाव शाखाप्रमुख अजय बाठे उपप्रमुख गोपाल गुलगे सचिव कांतीलाल पटेल सहसचिव अवधूत काटे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम येवले सदस्य अजय मोरे सदस्य तुषार रायपुरे व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी दिले. त्यावेळी सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
0 Comments