Advertisement

दुकानाची वसुली करुन बोलेरोने येणाऱ्या दोघांना वाटेत अडवून 378000/- रुपये कॅश लुटल्याची घटना नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे

दुकानाची  वसुली करुन बोलेरोने येणाऱ्या दोघांना वाटेत अडवून 378000/- रुपये कॅश  लुटल्याची घटना
नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे
 येरळी जवळ दोघांना तिघांनी लुटले 
३,७८०००/- रुपये /- रुपये  नेले जबरीने चोरून
नांदुराः मलकापूर येथील एका ट्रेडिंग कंपनीचे व्यापाऱ्यांकडील उधारीच्या पैश्यांची वसुली करून जात असलेल्या दोघांच्या मोठ्या वाहनासमोर रस्त्यावर मोटरसायकल आडवी पाडून डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करीत तिघांनी जबरीने ३,७८०००हजार रु रोख रक्कम व व्यापाऱ्यांनी दिलेले काही धनादेश चोरून नेल्याची खळबळजनक घटना नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा नदीवरील येरळी पूलाजवळ १८ऑक्टोबर च्या रात्री १० वाजेदरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की
राजू हरी गव्हाळे वय ४३वर्षे रा संत ज्ञानेश्वर नगर मलकापूर यांनी नांदुरा पो स्टे ला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की मी मलकापूर येथील ओम ट्रेडिंग कंपनीमध्ये काम करतो कंपनीचे व्यापाऱ्यांकडे असलेले उधारीचे पैसे वसूल करून बोलेरो गाडी क्रं एम एच- २८-एबी-४८७०ने घेऊन येत असतांना दुचाकीवरून आलेल्या तिघां अनोळखी इसमांनी त्यांची गाडी सिनेस्टाईल पद्धतीने आमच्या गाडी समोर आडवी पाडून थांबवली व काही कळायच्या आतच माझ्या व सोबत असलेल्या अंशु जावळेकर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण करीत गाडीतील पांढऱ्या रंगाच्या पिशवीत उधारीचे वसूल केलेले ३,७८,०००नगदी ,वसुली याद्या, यश सुपर या दुकानदाराने दिलेले दोन धनादेश, शाकंभरी दुकानदाराने दिलेला एक चेक बळजबरीने गाडीतून काढून चोरून घेऊन गेले याप्रकरणी नांदुरा पोलीसांनी अज्ञात तिन आरोपींविरोधात भांदवीच्या कलम ३९४,३४१अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या लुटमार प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी हे करीत आहेत 


 

Post a Comment

0 Comments