Advertisement

खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
 दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारत सरकार द्वारा श्रीमती रक्षाताई खडसे तसेच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या प्रयत्नाने भारत सरकार एडीपी योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपासाठी दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तर या कार्यक्रमात ज्या दिव्यांग बांधवाची तपासणी झाली होती अश्या दिव्यांग बांधवांना कुत्रिम अवयव चे वाटप दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता मलकापूर येथील भात्रु मंडळ येथे कुत्रीम अवयव वितरीत करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
 तरी मलकापूर तालुक्यातील दिव्यांग बाधवांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष संजय काजळे शहराध्यक्ष मिलिंद डवले रामभाऊ झांबरे विजयकुमार डागा व तसेच दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन मलकापूर चे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे व जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments