पिंपळगाव काळे:- अग्रीम २५% पीक विम्यासाठी पिंपळगांव काळे येथील नागरिकांचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन. जळगाव.(जा) तालुक्यातील पिंपळगाव काळे मंडळात तब्बल ३५ दिवस पावसाचा एक थेंब सुद्धा पडला नाही परंतु काही दिवसांपूर्वी पिंपळगाव काळे मंडळ २१ दिवस पावसात खंड पडल्यामुळे २५% अग्रीम पिक विमा मदतीतुन वगळण्यात आला आहे. आपणास विनंती आहे पिंपळगांव काळे महसूल मंडळात प्रत्येक गावात कृषी विभागाचे कर्मचारी पाठवून रीतसर चौकशी करावी. जेणेकरून आमच्या मंडळावर अन्याय होणार नाही. जर या प्रकाराची चौकशी न झाल्यास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यास पिंपळगांव काळे महसूल मंडळातील सर्व शेतकरी बंधावसंमवेत दि ११/१०/२०२३ बुधवार पासून अमारण उपोषण करू अश्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले
निवेदन देते वेळी प्रकाश विठ्ठलराव भिसे, वासुदेव दादा चोखंडे महेंद्र भाऊ तायडे, गणेश बोदडे, भास्कर वाघमारे, महादेव बाजोडे इ शेतकरी उपस्थित होते.
0 Comments