नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे
नांदुरा तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या माळेगाव गोंड परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तत्काळ सानुग्रह मदत द्यावी, या मागणीकरिता १० ऑक्टोबर रोजी मनसेचे तालुका उपाध्यक्ष राजेश काळे यांनी माळेगाव येथील बस स्टॅण्ड परिसरातील झाडावर मचान तयार करून उपोषण सुरू केले होते. त्याच दिवशी रात्री तहसीलदारांनी सानुग्रह मदत वितरणाला सुरुवात झाल्याचे लेखी पत्र दिल्याने उपोषणाची सांगता झाली.
नांदुरा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, या मागणीकरिता मनसेचे तालुका उपाध्यक्ष राजेश काळे यांनी १० ऑक्टोबरपासून माळेगाव गोंड येथील बसस्थानक परिसरातील झाडावर सांगता झाली.
खाटेच्या साह्याने मचान तयार करून खाटेवर बसून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू करताच नांदुरा पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन उपोषणाचा मार्ग असंवैधानिक असल्याचा व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणारा असल्याची नोटीस दिली होती. मात्र, उपोषणकर्त्यांनी त्यांचे उपोषण सुरू ठेवले अखेर त्याच दिवशी रात्री तहसीलदारांनी सानुग्रह मदतीचे वितरण सुरू केल्याबाबतचे लेखी पत्र उपोषणकर्त्याला दिल्याने उपोषणाची
0 Comments