Advertisement

मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यात आले.मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नेमण्यात आले.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक उभारण्यात आले.आज दिनांक 05/10/2023 रोजी येत्या काळात दुर्गा/जगदंबा देवी उत्सव साजरा करण्यात येणारा असून त्याअनुशंगाने व महीलांची सुरक्षिततेच्या समधाने दामिनी पथका निर्भया पथका चिडीमार पथकाची नेमणुक करण्यात आलेली असून सदर पथकामधे सपोनि स्मिता महसाये मॅडम पोहेकॉ सविता मोरे पोस्टे मलकापुर शहर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना पोस्टे मलकापुर शहर परीसरातील शाळा, कॉलेज बस स्टैन्ड शिकवणी वर्ग येथे भेट देवुन महीला मुली यांना चिडीमार सारख्या होणा-या घटना तसेच इतर प्रकारचा मुलींना होणा-या त्रासाबाबत प्रबोधन करण्याचे तसेच सायबर कॅफे, आइसक्रीम पार्लर येथे अवैध्य प्रकार चालणार नाहीत याबाबत पो.नि. विलास पाटील पोस्टे मलकापुर शहर यांनी आदेशीत केल्याने दामिनी पथक प्रमुख सपोनि स्मिता महसाये मॅडम सोबत पो स्टॉप सह ) गोळे फॉर्मसी कॉलेज बुलडाणा रोड मलकापुर 2) विद्या विकास महाविद्यालय मलकापुर 3) गोविंद विष्णु महाजन शाळा मलकापुर 4) जनता कला वाणिज्यं महाविद्यालय मलकापुर येथे भेटी देवून आयोजन करुन मुलींना प्रबोधन केले आहेत. तसेच मुलींसोबत वैयक्तीक रित्या भेटून चर्चा केली व त्याच्या अडचणी समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे तरी कोणत्याही महीला मुली यांना काही विघ्नसंतोषी लोकांकडुन त्रास झाल्यास किंवा अडचणी असल्यास अथवा महीला सुरक्षा संबंधाने अडचणी असल्यास खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

1) पो. नि. विलास पाटील. 
मो.7020514160
2) सपोनि स्मिता म्हसाये (दामिनी पथक प्रमुख)
 मो. 8329033472 
3) म. पोहेकॉ सविता मोरे 
मो.9322465707
पोलीस स्टेशन मलकापूर शहर
मो.917267,222018

Post a Comment

0 Comments