अकोट अकोला रोडचे नवनिर्मानाचे काम चालू असल्यापासून रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कायम दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे या रस्त्याची डागडुजी आजपर्यंत कधी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही रोडची अक्षरशः चाळणी झाली होती आनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल वारंवार तक्रारी येत असल्याने *चोहोट्टा बाजार येथील मुख्य रस्ता पाचबोले यांच्या दुकान पासुन ते जिल्हा परिषद शाळा रोड पर्यत* तात्काळ दुरुस्त करन्याची मागणी एका पत्राद्वारे शिवसेनेच्या वतीने शरद दादा बुंदे पाटील जिल्हा उपप्रमुख शिक्षक आघाडी शिवसेना (ऊ.बा.ठा ) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.शरददादा पाटील बुंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याचे कळाल्यानंतर जिल्हा परिषद अकोला विरोधी पक्षनेते शिवसेना जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर यांनी या बाबतीत विस्तृतपणे माहिती जाणून घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला समज देत लवकरात लवकर चोहोट्टा बाजार येथिल मुख्य रस्ता दुरुस्त करण्याचें ठणकावून सांगितले*
0 Comments