अकोला प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे 17 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मनूताई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून पाच किलोमीटर चालणे यामध्ये जव्हेरिया खान हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. 1500 मीटर धावण्यात कुमारी श्रावणी कौसकार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. 110 मीटर हरडल मध्ये कुमारी पुनम झोंबाडे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला, तसेच 400 मीटर रिले मध्ये कुमारी पुनम झोंबाडे, कुमारी निकिता जाधव, कुमारी प्राजक्ता लठाड, जव्हेरिया खान यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. जव्हेरिया खान व कुमारी पुनम झोंबाडे व रिले मधील सर्व यशस्वी विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. 14 वर्षे वयोगटातील खो खो ची टीम उपविजेती ठरली खो-खोच्या निवड चाचणी मध्ये कुमारी अर्पिता काळे हिची निवड झाली. कुमारी प्राजक्ता लठाड हिने भालाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. वरील सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. संज्योतीताई मांगे यांनी. यशस्वी विद्यार्थिनींचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ऐश्वर्याताई धारस्कर यांनी कौतुक केले तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती संज्योतीताई मांगे यांचे अभिनंदन केले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे व श्रीमती मांगे मॅडम यांचे अभिनंदन केले.
0 Comments