पिंपळगांव काळे:- जळगाव (जा) तालुक्यातील पिंपळगाव काळे महसूल मंडळात तब्बल ३५ दिवस पावसाचा एक थेंब सुद्धा पडला नाही परंतु काही दिवसांपूर्वी पिंपळगाव काळे मंडळ २१ दिवस पावसात खंड पडल्यामुळे २५% अग्रीम पिक विमा मदतीतुन वगळण्यात आला आहे. पिंपळगांव काळे महसूल मंडळातील कृषी विभागामार्फत लावण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्र महसूल मंडळाच्या शेवटच्या मोहीदेपुर गावात लावण्यात आले परंतु मोहीदेपुर वगळता मंडळातील कुठल्याही गावात पाऊस झाला नाही तरीही मंडळातील बाकीच्या गावावर अन्याय का? म्हणून आज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांना तात्काळ २५% अग्रीम पीक विमा पिंपळगांव काळे महसूल मंडळाला देण्यात यावा. संपूर्ण महसूल मंडळाचे मानवी सर्वे करून २५% अग्रीम पीक विमा मंजूर करा. पर्जन्यमापक यंत्र हे महसूल मंडळाच्या मध्यभागी लावण्यात यावे. विमा कंपनी कडे तक्रार केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पिक विमा कंपनी कडून सर्वे करण्यात यावे. या सर्व मागण्यांसाठी आज जळगाव जामोद तहसील कार्याला समोर पिंपळगांव काळे महसुल मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण कर्ते प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वात शेतकरी बांधवांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे त्यावेळी प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने भेट देत आहेत त्यावेळी वासुदेव दादा चोखंडे, पि.काळे सरपंच शे.हारून,विजय बहादरे, संपत बुंदे, सुपडा मानकर, रतन नाईक, सुनिल बोदडे, विजय सातव, श्रीकृष्ण वानखडे, निलेश वानखडे, सुनील काकडे, संतोष जवरे, गणेश बोदडे, मयूर राऊत, ज्ञानेश्वर कोकाटे, गजानन चोखंडे, गणेश इंगळे, सुपडा बांगर, बालु निकम, भगवान परस्कार, बाळू राऊत,भास्कर वाघमारे, मनोहर पाटील, महेंद्र तायडे, भास्कर भगत, अनेक शेतकरी बांधव येत आहेत.
0 Comments