Advertisement

धरणगांव येथे वाढते गुन्हयाचे चोरी व इतर प्रकार लक्षात घेता ग्रा.प. च्या वतीने गावातील मुख्य चौकात तसेच प्रत्येक वार्डत सि.सी.टी.ही. कॅमेरे बसविण्यात यावे.सामाजिक कार्यकर्ते करण विनोद झनके व समस्त नागरिकांची मागणी..

धरणगांव येथे वाढते गुन्हयाचे चोरी व इतर प्रकार लक्षात घेता ग्रा.प. च्या वतीने गावातील मुख्य चौकात तसेच प्रत्येक वार्डत सि.सी.टी.ही. कॅमेरे बसविण्यात यावे.सामाजिक कार्यकर्ते करण विनोद झनके व समस्त नागरिकांची मागणी...!
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर:मलकापूर तालुक्यातील मौ जे धरणगांव ता. येथे आजु बाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत असून या वाढत असलेल्या वस्ती तसेच सदर गांव हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या लगत असल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत असून या मध्ये अनेकदा किरकोळ प्रमाणात चोरी वा इतर प्रकार होत असून या किरकोळ चोरी वा इतर प्रकाराची माहिती कायद्याचा तगादा मागे लागू नये म्हणून बऱ्याचदा पोलिस स्टेशनला तक्रार सुध्दा देत नाही, त्यामुळे गुन्हेगारांचे फावत असून या सद्यस्थितीत चोरी वा इतर गुन्हयाचे या मध्ये अवध व्यवसायाचे प्रमाण वाढत असून या मधूनच नव नविन गुन्हे घडत आहे, त्यामुळे गावात जर ग्राम पंचायतच्या वतीने गावातील मुख्य चौकात तसेच प्रत्येक वार्डात तर सि.सी.टी.व्ही कॅमेरे बसविले तर या गुन्हेगारांची ओळख पटविण्यास मदत होईल किंवा या गुन्हेगारावर वचक पडण्यासाठी उपयोग होईल. तरी आपणास विनंती की, ग्राम पंचायत च्या सामान्य फंडातून किंवा वित्त आयोगाच्या फंडातून गावामध्ये सि.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याकरीता योग्य ती कारवाई करावी जेणेकरून गावातील अवैध व्यवसाया व इतर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल.करीता सरपंच सचिव याना सामाजिक कार्यकर्ते करण विनोद झनके व समस्त नागरिक यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments