जळगांव (जामोद), दि. १० ऑक्टोबर २०२३:
सातपुडा शिक्षण संस्था संचालित स्वातंत्र्यविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,जळगांव (जामोद) येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांच्या अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन खो-खो क्रिडा स्पर्धेचे आयोजन दि. १० ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत करण्यात आले आहेत. या आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे उद्घाटन दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वा. मा.आ.श्री.कृष्णारावजी इंगळे (अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद) यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक तथा कोच यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. उद्घाटन समारंभा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. संदीप हाडोळे (विद्यार्थी कल्याण अधिकारी, डॉ.पं. दे. कृ. वि. अकोला), मा.श्री हरिभाऊजी इंगळे (उपाध्यक्ष सातपुडा शिक्षण संस्था) डॉ.स्वातीताई वाकेकर (कोषाध्यक्ष सातपूडा शिक्षण संस्था), डॉ. संदीप वाकेकर, मा.श्री नितीनजी सातव (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातपुडा शिक्षण संस्था), डॉ. विशाल तायडे (प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय), प्रा.राहुल तायडे (प्राचार्य,कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय), प्रा. योगेश गवई (प्राचार्य, कृषी महाविद्यालय), जळगांव जामोद, प्रा.सतिश धर्माळ, प्रा. चंद्रशेखर भोपळे, डॉ. विरेंद्र डेरे (अध्यक्ष, निवड समिती, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला), पंच प्रतिनिधी श्री. येउल तसेच आयोजन समितीचे सदस्य प्रा.आकाश सुने, प्रा. निखिल भोपळे, प्रा. वैभव हागे, प्रा. प्रमोद ढवळे, डॉ. अनिकेत उमाळे, प्रा. अविनाश आटोळे, प्रा.कू. अनुराधा चोपडे, प्रा. कु. स्नेहल बायस्कर, प्रा. कु. प्रेरणा कुटे व इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका तथा कर्मचारी उपस्थित होते.
सुरवातीस प्रा. जिव्हेश साळी यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविकातून डॉ. विशाल तायडे (प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय) यांनी सातपुडा शिक्षण संस्था, खो-खो खेळाची ओळख, महत्व व फायदे यांची माहिती दिली व सर्व खेळाडूंना अशक्य आणि शक्य यातील फरक माणसाचा दृढनिश्चयामध्ये असतो तसेच चिकाटीने अपयशाला असाधारणपणे यशात बदलता येते असे सांगून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत प्रास्ताविक केले. तसेच मार्गदर्शन पर संबोधन करताना डॉ. स्वातीताई वाकेकर (कोषाध्यक्षा, सातपुडा शिक्षण संस्था) यांनी विजय आणि पराजय कसा नियंत्रित करावा, खेळाचे शारीरिक तथा मानसिक फायदे, सरावातून व सातत्य पूर्ण परिश्रमातून विजय हा निश्चित असतो असे सांगितले व सातपुडा शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचे यश सांगून सर्व स्पर्धकांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेमध्ये एकूण मुलांचे २२ संघ व मुलींचे १९ संघ सहभागी झाले आहेत, त्यापैकी उद्घाटन सामना मुलांमधून मारोतराव वादाफले कृषी महाविद्यालय, यवतमाळ व कृषी महाविद्यालय, नागपूर आणि मुलींमधून कृषी महाविद्यालय, उमरखेड व बजाज कृषी महाविद्यालय, वर्धा या संघांमध्ये झाला.
0 Comments