Advertisement

आशा वर्कसना ,आरोग्य वर्धीनीचा सरसकट मोबदला द्यावा

आशा वर्कसना ,आरोग्य वर्धीनीचा सरसकट मोबदला द्यावा ऑनलाईन कामाची सक्ती करू नये
राज्य व केंद्र सरकारचा मोबदला एकत्र ०५ तारखे च्या आत मिळावा

बाळासाहेब नेरकर कडून
आशांना जो पर्यंत कायम कर्मचारी चा दर्जा मिळत नाही तो पर्यंत इतर राज्यांप्रमणे दर महा १०,००० रुपये मानधन देण्यात यावे.
आशांना त्यांच्या जॉब कार्ड व्यतिरिक्त इतर कोणतेही काम सांगू नये
आशा व गट प्रवर्तक या कामांवर आधारित मोबदल्यावर राहतात म्हणून त्यांना प्रसूती रजा मिळत नाही तर सामाजिक भान ठेवून ०६ महिने प्रसूती रजा मिळावी व या काळात मानधन ही मिळावे अशी मागणी यांनी आशा वर्कर्स यांनी आज भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे केली आमदार सावरकर यांनी यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याची अभिवचन दिले यावेळी आशा वर्कर यांच्या कामाची प्रशंसा आमदार सावरकर यांनी केली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गाढवे,जिल्हा आशा समन्वयक सचिन उनवणे,भाजप तालुका अध्यक्ष देवेंद्र देवर,ऍड.रुपालीताई काकडे,डॉ.अमित कावरे ,माधव मानकर, गणेश लोड, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर अभय जैन, मोहनपारधी,अंबादास उमाळे,गजानन मानखैर अक्षय जोशी एडवोकेट देवाशिष काकड संजय,गोडा, सुरेश जाधव संजय गोटफोटे व आशासेविका उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments