डॉ. आशिषराव र. देशमुख
बाळासाहेब नेरकर
• अकोला जिल्ह्यात ओबीसी जागर यात्रेला भरघोस प्रतिसाद. • डॉ. आशिषराव र. देशमुख यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर यात्रा.
• आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री. हरीशजी पिंपळे, आमदार श्री. प्रकाश भारसाकळे, आमदार श्री. वसंतजी खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती.
भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेतर्फे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंपर्क साधून सभा घेण्यात आल्या. जनसंपर्काच्या माध्यमातून ओबीसी जागर यात्रेचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांच्या आयोजनात आणि कुशल नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे.
अकोला येथे आयोजित भव्य सभेत डॉ. आशिषराव र. देशमुख म्हणाले, “२ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पालथी घालायला निघाली. केंद्र आणि राज्याच्या ओबीसींच्या फायद्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात म्हणून ही यात्रा काढली आहे. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र आहे. ओबीसी हा भाजपाचा गाभा आहे, भाजपाचा डीएनए आहे. आज जर कॉंग्रेस ओबीसींबद्दल प्रेम दाखवत असेल तर ते ‘पुतना मावशी’चे प्रेम आहे. कॉंग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे ओबीसी आर्थिकदृष्ट्या कमजोर राहिला. कॉंग्रेस ओबीसी आणि मराठा समाजाबद्दल संभ्रम निर्माण करून धूळफेक करीत आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ओबीसी समाजातील सर्व घटकांना फायदा होणार आहे. भाजपा ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. घरकुल योजना, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मेडिकलच्या शिक्षणामध्ये आरक्षण अशा अनेक योजना सरकारने उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात १६३ एमएलसी भाजपाचे आहेत, त्यापैकी ६५ ओबीसी समाजाचे आहेत. आपल्या संपूर्ण देशात ३०३ खासदार भाजपाचे आहेत. त्यापैकी ८५ खासदार हे ओबीसी समाजाचे आहेत. २ वर्षांपूर्वी पंतप्रधान श्री. मोदीजींनी देशाच्या कॅबिनेटचा विस्तार केला, त्यामध्ये ३०% पेक्षा जास्त मंत्री ओबीसी समाजाचे घेतले. स्वत: श्री. मोदीजी देखील ओबीसी समाजाचे आहेत. देशाचे पहिले ओबीसी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी असून भाजपाने ओबीसींना न्याय देण्याचे काम केले आहे. १९५२ पासून आजपर्यंत कॉंग्रेसने फ़क़्त १७% ओबीसी मुख्यमंत्री केले. त्या तुलनेत भाजपाने ६८ मुख्यमंत्र्यापैकी २१ मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे केले. संपूर्ण देशात भाजपाचे १३५८ आमदार आहेत. त्यापैकी ३६५ निवडून आलेले विधासभेतील आमदार हे ओबीसी समाजाचे आहेत, म्हणजेच २७% आमदार ओबीसी समाजाचे आहेत. तिकीट जास्त ओबीसींना दिले होते पण ३६५ निवडून आलेत. ओबीसी एमएलसीची टक्केवारी ४० आहे. १२ बालूतेदारांसाठी अनेक योजना आणून भाजपा ओबीसींना एकत्रित आणण्याचे काम करीत आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर साखरपुडा केला, पण लग्न होताना दिसत नाही. बाळासाहेबांची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. आदरणीय बाबासाहेबांना पराभूत करणाऱ्या कॉंग्रेसच्या आघाडीसोबत ते गेलेत. भाजपा अकोला येथे बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. भाजपचा निर्धार, करू या ओबीसींचा उद्धार.”
याप्रसंगी श्री संजय गाते- अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, सौ अर्चनाताई डेहनकर- प्रदेश महामंत्री ओबीसी मोर्चा, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री. हरीशजी पिंपळे, आमदार श्री. प्रकाश भारसाकळे , आमदार श्री. वसंतजी खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, अनुपजी धोत्रे, माजी आमदार बळीरामजी सिरसकार मा आ नारायणराव गव्हाणकर,डॉ अशोक ओळंबे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिषराव र. देशमुख आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. संजय गाते यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र पादाक्रांत करीत आहे. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.
[ओबीसी जागर यात्रेची सुरुवात ०२ ऑक्टोबर २०२३ ला हिंगणघाटपासून झाली असून यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे १३ ऑक्टोबर २०२३ ला होईल. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले आहे.]
0 Comments