मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर, काही अभद्र गोष्टींमुळे मलकापूरचे नाव खराब होत चालल्याचे दिसून येत आहे. कॅफे संस्कृतीने तर मुला, मुलींना मोकळे रान उपलब्ध करून दिल्याने पालकांना शरमेने माना खाली घालण्याची वेळ आली आहे. १६ ऑक्टोबरला दुपारी कुलूपबंद असलेल्या एका कॅफेत १५ ते १७ वर्षे वयोगटातील तीन शाळकरी मुला, मुलींचे जोडपे अश्लील चाळे करत असल्याचे दामिनी पथकाच्या धाडीनंतर उघडकीस आले.
पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत मुला, मुलींना आई-वडिलांना स्वाधीन केले. पंचमुखी रोडवरील एका कुलूपबंद कॅफेत नको तो प्रकार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली त्यांनी दामिनी पथकाला अलर्ट केले. पथकप्रमुख एपीआय स्मिता म्हसाये, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मुळे धडक दिली असता बाहेरून कुलूप आढळले. कॅफेमालकाला संपर्क केला असता त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. कॅफेत दखलपात्र गुन्हा घडू नये, ही दक्षता घेत म्हसाये यांनी कुलूप तोडले असता १५ ते १७ वर्षे वयोगटातील
शहरातील कॅफेमध्ये समाजस्वास्थ्य बिघडवणारे लाजिरवाणे प्रकार चालत असतील तर कोणत्याही कॅफेवाल्याची गय केली जाणार नाही. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी.विलास पाटील, पीआय.तीन मुले व तीन मुली असभ्य वर्तन करताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली. या कार्यवाहीत सपोनि स्मिता म्हसाये, ज्ञानेश्वर मुळे, प्रियंका डहाके, संतोष कुमावत, ईश्वर वाघ सहभागी झाले होते.
0 Comments