वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळ नवरात्र उत्सव दरम्यान जिल्ह्यातील अनेक मान्यवरानी दोन दिवसापूर्वी उपस्थिती
खामगाव प्रतिनिधी राजेश काळे
खामगाव शहरातील सराफा बाजार चौकातील वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडळ येथे नवरात्र उत्सव दरम्यान जिल्ह्यातील अनेक मान्यवरानी दोन दिवसापूर्वी उपस्थिती दर्शवून देवीची महाआरती केली होती यात राज्यसभा खा डॉ अनिल बोन्डे त्यांच्या अर्धांगिनी डॉ वसुधा बोन्डे,अमरावती परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार , शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आ सुलभा खोडके, यांनी हजेरी लावून त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली ..आज शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर ला सायंकाळी ७ वाजता प्रसाद आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले होते ,, या ठिकाणी माजी राज्यमंत्री तसेच आ बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांनी सुद्धा देवीची पूजा अर्चना करून आरती केली ,,तत्पूर्वी मंडळ पदाधिकारी वतीने आ बच्चू कडू यांचा भगवी टोपी दुपट्टा आणि फोटो देऊन सन्मान करण्यात आला या सोबतच मंडळ वतीने आयोजित केलेल्या प्रसाद वितरणाचा आ बच्चू कडू यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी मंडळ वतीने साकारण्यात आलेल्या सुलसा हनुमान प्रसंग सह अष्टक हनुमानाची मनमोहक झाकी चा सुद्धा आ बच्चू कडू यांनी अवलोकन करून मंडळाच्या धार्मिक सांस्कृतिक कार्याची प्रशंसा केली ,,कार्यक्रम स्थळी मंडळ प्रमुख महेंद्र चोपडा यांचा समाजसेवक गोविंद कासट यांनी शाल आणि आनंद यात्री पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले तर आ बच्चू कडू यांनी मंडळ पदाधिकाऱ्या सोबत अनेक वेळा पर्यत चर्चा करून मंडळाच्या कार्याची माहिती जाणून घेतली
यासोबतच सराफा व्यावसायिकांच्या दुकानाला भेट देऊन त्याच्या सोबत हितगुज साधला ,, यावेळी महोत्सव मंडळाचे अध्यक्ष ऍड प्रकाश चितलांगे ,मंडळ उत्सव अध्यक्ष ऍड प्रशांत देशपांडे , सचिव सुरेश रणछोडदास शर्मा , मंडळ संरक्षक डॉ चंदू सोजतिया उपाध्यक्ष विनोद डागा , विनय शर्मा , संजय मुनोत महेश बजाज संजय उपाध्याय , कोषाध्यक्ष राजेंद्र जैन संजय चोपडा सासचिव सागर चांडक विक्की पनिया नुकूल डाबी, गौरीशंकर हेडा रसिकभाई जोशी अविनाश पाटील राजेश साहू दीपक खिवंसरा विशाल राठी मुरलीधर डोबा प्रफुल दवे गिरीश बजाज जुगल दवे श्याम वर्मा अशोक अंदुरे संजय जैन ऍड सुमित शर्मा महेश शर्मा गोपाळ महाराज उपाध्याय पंडित वसंत दवे जुगलकिशोर पटेरीया सह मंडळ पदाधिकारी आणि शेकडो भाविक उपस्थितीत होते
0 Comments