Advertisement

शासनाने दिलेल्या आश्वासनांची समिती ने करून दिली आठवण प्रतिनिधी नागेश सुरंगे

शासनाने दिलेल्या आश्वासनांची समिती ने करून दिली आठवण 

प्रतिनिधी नागेश सुरंगे
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती (विदर्भ प्रदेश) च्या शिष्टमंडळ यांनी दि. ३ ते ५ ऑक्टोबर ला मंत्रालय मुंबई येथे संबंधित मंत्री महोदय यांच्या भेटी घेतल्या,
                विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचे दि. १५ ते २५ मे २०२३ ला आझाद मैदान मुंबई येथे १) सन २००६ ते २०१३ मध्ये झालेल्या सरळ खरेदी धारक शेतकरी यांना सन २०१३ च्या पुनर्वसन कायद्यानुसार सानुग्रह निधि मिळण्यात यावा. २) प्रकल्पग्रस्तांचे ५℅ चे समांतर आरक्षण १५℅ करण्यात यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबातील एका सदस्यांना शासकीय, निमशासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, ते शक्य नसल्यास २० लक्ष रु. सानुग्रह निधी देण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. 
            त्यावेळी मा. मुख्यमंत्री श्री.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची शिष्टमंडळ यांनी भेट घेतली होती. तेव्हा मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या सुचनेनुसार कॅबिनेट मंत्री मा. ना. मंगलप्रभात लोढा, तसेच अपर मुख्य सचिव मा. दिपक कपूर साहेब यांना आझाद मैदान येथे उपोषण स्थळी पाठवून प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले होते की, लवकरच समिती समवेत शासनाची बैठक आयोजित करुन प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय मिळवून दिले जातील. 
               परंतु आजपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने शिष्टमंडळ यांनी अपर मुख्य सचिव मा. दिपक कपूर साहेब, व कॅबिनेट मंत्री मा. ना. मंगलप्रभात लोढा साहेब यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन आझाद मैदान मुंबई येथे दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. या मान्यवरांनी शिष्टमंडळासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली. 
             यावेळी मा. ना. मंगलप्रभात लोढा साहेब यांनी त्वरित मुख्यमंत्री साहेब यांना पत्र देऊन बैठक आयोजित करण्याचे सूचित केले. 
              तसेच मा. मुख्यमंत्री साहेब, मा. उपमुख्यमंत्री साहेब , कृषीमंत्री मा. ना. धनंजय मुंडे साहेब, इ. मान्यवर यांची सुद्धा भेट घेऊन माहिती दिली. 
               यावेळी समिती शिष्टमंडळ मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती (विदर्भ प्रदेश) चे अध्यक्ष मनोजभाऊ तायडे, समिती कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर, समिती उपाध्यक्ष विकासभाऊ राणे, संजय भरदूक, नरेंद्र पांडव (जिगांव प्रकल्प) इ. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments