Advertisement

पं स अकोट सभापती सौ. हरिदिनीई वाघोडे यांनी दिली "पेपरलेस केंद्र करोडी ला आकस्मिक भेट

अकोट प्रतिनिधी अमोल राणे
पं स अकोट सभापती सौ. हरिदिनीई वाघोडे यांनी दिली "पेपरलेस केंद्र करोडी ला आकस्मिक भेट " 
 दिनांक 03/10/2023 ला पंचायत समिती सभापती हरिदीनी ताई वाघोळे यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा चोहोटटा बाजार येथे आकस्मिक भेट दिली,भेटी मद्ये स्वच्छ व नीटनेटका शालेय परिसर बघून अतिशय समाधान व्यक्त केले .सर्व वर्गांना भेट देऊन वर्गातील विद्यार्थ्यांशी अतिशय आपुलकीने जवळीक साधली .विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले ,सुंदर असं गीत म्हणून दाखवलं तसेच बोधकथेद्वारे त्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले व शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या. 
शाळेचे असे सुशोभीकरण पाहून ताईनी शाळेतील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापीका सविता कुटेमाटे,सह्याक शिक्षिका मनीषा साठे,वंदना गर्जे, आणि रेश्मा सानप यांचे ही कौतुक केले ताई नी आपल्या मार्गदर्शन मधे सांगितल की कमी पटाच्या शाळा बंद होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले तसेच आजची भेटीत सभापती मॅडम यांना उपक्रमशील शिक्षक शरद झामरे सर यांनी आमचं करोडी केंद्र पेपरलेस केंद्र म्हणून जिल्ह्यात एकमेव केंद्र आहे सर्व प्रशासकीय बाब विना कागद हाताळली जाते त्याबद्दल माहिती सांगितली मॅडमनी सदर उपक्रम ऐकून केंद्रातील केंद्र,प्रमुख श्री अभिषेक भांडे सर यांचं तोंड भरून कौतुक केले आणि सदर केंद्र प्रमुख यांचे अभिनंदन चा ठराव पंचायत समिती अकोट येथे झालेलं आहे अशे सांगितले आणि केंद्र प्रमुख अभिषेक भांडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .यावेळी गावचे सरपंच श्री. सुभाष भाऊ मुकुंदे स्वतः उपस्थित होते. तसेच ग्रा.प. सदस्य व शा .व्य .स. सदस्य देखील उपस्थित होते
याशिवाय पं .स. सदस्य सौ .इम्तियाज बी मॅडम, मुस्ताख भाई,साधन व्यक्ती सौ.तृप्ती बिजवे मॅडम,वरूर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.अयुब सर तसेच आपल्या करोडी केंद्रातील रेल मराठी येथील ज्येष्ठ उच्च श्रेणी मु.अ.श्री.काशिनाथ अंबलकार सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संचालन शरद झामरे यांनी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Post a Comment

0 Comments