तहसीलदार धनमने यांना सक्तीच्या रजेवर पाठवून विभागीय अहवालानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई होणार खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचे आश्वासन अवैद्य रेती उत्खनना बाबत शिवसेना तालुकाप्रमुख अनिल चित्ते व विकास गवई यांनी दोन ऑक्टोंबर पासून संत चोखासागर धरणामधील पाण्यातील बेटावर गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले होते विभागीय आयुक्त यांनी नेमलेल्या अवैद्य रेती उत्खननाच्या चौकशी समितीकडून जो अहवाल प्राप्त झाला त्या अहवालाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी संबंधित अप्पर जिल्हा अधिकारी बुलढाणा गोणखणीज अधिकारी बुलढाणा विभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्ताव जिल्हा अधिकाऱ्यांना विना विलंब कारवाईस्तव मागितले होते तसेच तहसीलदार श्याम धनमने सह नायब तहसीलदार विकास राणे मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर कारवाईस्तव प्रस्ताव मागितले होते परंतु संबंधितावर कारवाईस विलंब होत असल्यामुळे अनिल चित्ते विकास गवई यांनी दहा दिवसापूर्वी उपोषण सुरू केले होते त्यांची तब्येत खालावत चालली होती मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही या ठाम भूमिकेवर उपोषण करते होते परंतु संबंधितावर कारवाईस मंत्रालयातील पुढील प्रोसिजरला टाईम लागत असल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव साहेब तसेच डॉ. शशिकांत खेडेकर साहेब यांनी उपोषणकर्त्यांना पुढील कारवाई साठी पाठपुरावा करून संबंधितावर ठोस कारवाई करण्याचे तसेच कारवाई होईपर्यंत तहसीलदार धनमाने यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांना फोनवर बोलून आश्वासन देऊन उपोषण सोडले तसेच उपोषण स्थळी उपस्थित असलेले अप्पर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना भविष्यात अवैध रेती उत्खनन होणार नाही तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार रेती डेपो सुरू करून रेती उपलब्ध करून देण्याचे तसेच घरकुल योजनेसाठी पाच ब्रास फुकट रेती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या तसेच टाकरखेड भागिले येथील अवैध्य रेती उत्खनन करणाऱ्या टिप्परच्या धडकेत मूर्ती मुखी पडलेले स्वर्गवासी समाधान भागिले यांचा तेरा वर्षाचा मुलगा यश याने सुद्धा आपल्या व्यथा एका निवेदनात मांडून जाधव साहेबांना निवेदन दिले व संबंधितावर कारवाई करण्याची विनंती केली या वेळी खासदार प्रतापराव जाधव साहेबांसह डॉ. शशिकांत खेडेकर साहेब तसेच शिवसेना पदाधिकारी बाबुरावजी मोरे दीपकजी बोरकर गजेंद्र देशमुख सर शिंपणे साहेब विजुभाऊ उपाध्ये पूजाताई खांडेभराड संदीप मगर अमोल काकड सुभाष सवडे प्रभाकर खांडेभराड सह तालुक्यातील पत्रकार बांधव शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच परिसरातील सरपंचासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments