शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचा ऑन द स्पॉट निपटारा..
वृत्तसंकलन बाळासाहेब नेरकर
हिवरखेड :- हिवरखेड सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या आजूबाजूच्या अनेक गावांच्या विजे संबंधित समस्यांचा आज आमदार प्रकाश भारसाकळे यांनी ऑन द स्पॉट निपटारा केला.
हिवरखेड परिसरातील तळेगाव खुर्द ,खंडाळा बोरव्हा चीतलवाडी,दिवानझरी, मोराळी, सोनवाडी, दानापूर, सौंदळा यासह हिवरखेड सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या विजेच्या संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने 17 ऑक्टोंबर रोजी अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हिवरखेड सबस्टेशन येथे शेतकऱ्यांना आवाहन करून एका छोटेखानी मिटिंग चे आयोजन केले होते यामध्ये परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती. यामध्ये प्रामुख्याने खंडाळा व दिवाणझरी फिडरवरील शेतकऱ्यांच्या समस्यांसह प्रस्तावित दिवाणझरी सब स्टेशन यासह शेतकरी व ग्रामस्थांच्या विजे संदर्भातील विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी आमदार भारसाकळे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता उईके साहेब उपकार्यकरी अभियंता राठोड साहेब तसेच सहाय्यक अभियंता धांडे साहेब हे सुद्धा या मिटिंगला हजर होते. यामध्ये प्रामुख्याने ओव्हरलोड झालेल्या ट्रासफार्मर, नादुरुस्त असलेले ट्रान्सफार्मर,लोंबलेल्या विद्युत तारा, वाकलेले पोल तसेच शेतकऱ्यांना आठ तास नियमित वीजपुरवठा यासह पेंडिंग असलेले खाजगी मीटर कनेक्शन अश्या अनेक समस्या उपस्तीत शेतकऱ्यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या समोर मांडल्या यापैकी अनेक समस्या आमदार भारसाकळे यांनी जागेवरच सोडवून ईतर प्रलंबित समस्या बाबत उपस्तीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनाऊन एका महिन्यात या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन घेतले व जेथे आवश्यकता असेल येथे माझी मदत घ्या असेही आश्वासन दिले. या शेतकरी दरबार चे संचालन बाळासाहेब नेरकर यांनी तर प्रास्ताविक उपसरपंच रमेश दुतोंडे यांनी केले कीरण सेदानी यानी हिवरखेड गावातील समस्या मांडल्या या मिटींगला परिसरातील अनेक शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्तीत होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांनी दर महिन्याला असाच जनता दरबार भरवून शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावाव्यात अशी मागणी उपस्तीत ग्रामस्थांनी केली.
0 Comments