Advertisement

प्रतिनिधी:- अमोल रा राणे *न्यायाधीशांनी जि प शाळा करतवाडी (रेल्वे) ला दिली भेट

 न्यायाधीशांनी जि प शाळा करतवाडी (रेल्वे) ला दिली भेट
प्रतिनिधी अमोल राणे 
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करतवाडी रेल्वे येथे आज पर्यंतचे सर्वात मोठे पथक सन्माननीय न्यायाधीश चकोर बाविस्कर साहेब , मा.एस डी पी ओ रितू खोकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी गजानन सावरकर साहेब,इतर वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी वृंद तसेच करोडी केंद्राचे केंद्रप्रमुख अभिषेक भांडे सर यांनी नियोजित शालेय भौतिक सुविधा व स्वच्छता तपासणी अंतर्गत भेट दिली असता शाळेची संपूर्ण स्वच्छतागृह मुलामुलींचे स्वतंत्र, पाण्याची उत्तम व्यवस्था, शालेय वृक्षरोपण संवर्धन,शालेय भव्य परिसर स्वच्छता, आणि शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्ता पाहून भरभरून कौतुक केले. शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून झालेले स्वागत, आदरातिथ्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.,भेटीचेवेळी शाळेच्या मुख्याध्यापिका इंगळे मॅडम, टिकार मॅडम आणि शा.पो.आ.मदतनीस गायकवाड ताई उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments