Advertisement

सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. अंढेरा ठाणेदार विकास पाटील.

सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण केल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. अंढेरा ठाणेदार विकास पाटील. 
 दे/राजा सिंदखेडराजा
   देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस स्टेशन म्हणून ज्या पोलीस स्टेशनची संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ओळख आहे असे अंढेरा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चिखली व देळगाव राजा तालुक्यातील 52 गावे आहे या पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र खूप मोठे असल्यामुळे या ठिकाणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वच जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत असल्यामुळे सर्वच समाजाचे लोक आपल्या समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे आपापले सण साजरे करत असतात येथे सर्व जाती धर्म चे लोक एकोपा म्हणजे मिळुन मिसळून सर्वच सण साजरे करतात आता येणाऱ्या दुर्गा उत्सव निमित्त अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी अंढेरा कार्यक्षेत्र मध्ये येणाऱ्या गावचे पोलीस पाटील व पत्रकार यांचे संयुक्त बैठक अंढेरा येथे बोलवली होती त्यामध्ये त्यांनी सर्व पोलीस पाटील यांना सूचना केले आहे की कुठेही आणि कोणत्याही वेळेत जर ध्वनी प्रदूषण केले तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गय केले जाणार नाही कोणत्याही ठिकाणी जर ध्वनी प्रदूषण झाले आणि काही अवचित प्रकार घडल्यास त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सदस्य यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे उदगार पोलीस पाटील व पत्रकार मंडळी यांच्या संयुक्त मीटिंग मध्ये अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी काढले अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील भरपूर पोलीस पाटील हजार होते ज्या गावचे पुलिस पाटील मीटिंग ला हजर नव्हते त्यांना पत्र काढुन माहिती देण्यात येईल

Post a Comment

0 Comments