लोणार तालुक्यातील बीबी मंडळा मध्ये यावर्षी महसूल मंडळात यावर्षी सोयाबीन उत्पादनात घटले निसर्गाच्या लहरीपणा मुळे बिबी महसूल मंडळातील भुमराळा, किनगाव जट्टू, सावरगाव तेली, वझर आघाव,या परिसरातील सोयाबीन उत्पादन निम्मे घटले.
यावर्षी जून महिन्यात पाऊस न पडल्याने पेरण्या तब्बल पंचवीस दिवस,ते एक महिना उशिराने झाल्या, आणि पेरणीनंतरही जुलैमध्ये जास्त पाऊस, आणि ऑगस्टमध्ये एक ते सव्वा महिना पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकावर रोगराई जास्त प्रमाणात पडली, आणि पिवळ्या मोझ्याक रोगाने सोयाबीन मध्ये दाने भरण्या अगोदरच पीक अक्षरशः कोवळेच करपले,व यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळणे कठीण झाले आहे, सरासरी सोयाबीन उत्पादन एकरी आठ दहा क्विंटल येत असते,ते यावर्षी एकरी सरासरी तीन, चार क्विंटलच येत आहे, त्यामुळे या परिसरात शेतकरी हवालदिल झाले आहेत, व शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत,व सरसकट पिकविमा द्यावा,अशी मागणी ज्ञानेश्वर मोरे व इतर शेतकरी यांनी केली आहे
0 Comments