Advertisement

चाळीस हजार रुपये लाच घेताना कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी गजाआड

चाळीस हजार रुपये लाच घेताना कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी गजाआड
प्रतिनिधी शेगांव येथील सईबाई मोटे सामान्य रुण्यालयातील कनिष्ठ लिपीक यांना लाच घेतांना अटक करण्यात आली.मंगेश जगन्नाथ जोशी असे आरोपी लिपिकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आशवासित प्रगती योजनेचे बिल अदा करण्यासाठी कार्यालयीन आदेश तयार करुन त्यावर वैदयकिय अधिक्षक यांची सही घेवुन लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी आरोपी लोकसेवक मंगेश जगन्नाथ जोशी वय 38 वर्ष कनिष्ठ लिपिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगांव यांना अटक करण्यात आली प्राप्त माहितीनूसार
तक्रारदार यांच्या आशवासित प्रगती योजनेचे बिल अदा करण्यासाठी कार्यालयीन आदेश तयार करुन त्यावर वैदयकिय अधिक्षक यांची सही घेवुन लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी कनिष्ठ लिपिक यांने
 तक्रारदाराने चाळीस हजाराची लाच मागीतली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदारासोबत
आज दिंनाक 7 डिंसेबर रोजी सापळा लावला.तक्रारदार यांचा नोव्हेंबर महिन्याचा पगारासोबत बिलाची रक्कम जमा झाल्यानंतर आरोपी लाच स्विकार असल्यामुळे तक्रारदार यांचा नोव्हेबर महिन्याचा पगार जमा झाल्यामुळे आरोपी मंगेश जगन्नाथ जोशी यांने तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेवुन बोलावले होते.त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केलेली होती. आज दिनांक 7 डिंसेबर रोजी चाळीस हजार रुपये लाच रक्कम घेवुन बोलावल्यामुळे लाचेची रक्कम स्विकारतांना पोलिसांनी सापळा रचून जोशीला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मा.मारुती जगताप , पोलीस अधिक्षक , अॅन्टी करप्शन ब्युरो , अमरावती , परिक्षेत्र अमरावती . देविदास घेवारे , अप्पर पोलीस अधिक्षक , अॅन्टी करप्शन ब्युरो , अमरावती , परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती शितल घोगरे , पोलीस उपअधिक्षक बुलढाणा पोलीस निरीक्षक सचिन इंगळे , एएसआय भांगे , पोहेकॉ प्रविण बैरागी , पोना विनोद लोखंडे , जगदीश पवार , मपोकों स्वाती वाणी , नितीन शेटे अॅन्टी करप्शन ब्युरो , बुलडाणा यांनी सदर कारवाही पार पाडली .

Post a Comment

0 Comments