Advertisement

शेगाव शासकीय धान्य गोदाम बनले दारू मध्यपी चे माहेरघर अन्नपुरवठा निरीक्षकांचे दुर्लक्ष....

शेगाव शासकीय धान्य गोदाम बनले  दारू मध्यपी चे माहेरघर अन्नपुरवठा निरीक्षकांचे दुर्लक्ष....
 शेगाव तालुका प्रतिनिधी
शेगाव: येथील शासकीय धान्य गोदाम दारुड्यांचा माहेर घर झाल्याचे दिसून येत आहे. येथील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या शासकीय धान्य गोडाऊन येथून शेगाव शहर आणि शेगांव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शासकीय धान्याचा पुरवठा करण्यात येतो. त्याकारणाने या गोडाऊन मध्ये शेकडो क्विंटल धान्य साठवूण ठेवले जाते.अशा महत्त्वाचे असलेल्या शासकीय गोदामाची रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी  सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले नाही.त्या मुळे हे शासकीय धान्य गोडाऊन रात्री बेवारस स्थितीत राहते.याचा फायदा दारूडे घेतांना दिसतात या धान्य गोडाऊन मध्ये 
. एका बाजूचे फाटक तुटलेले असल्यामुळे या गोदामातून रात्रीच्या वेळी शासकीय धान्याचा काळाबाजार सुद्धा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही .या धान्य गोदामात व व गोदामाच्या परिसरात   दारूच्या शिष्यांचा ढीग  पडलेले आहेत. त्यामुळे   या सरकारी गोदामाचा उपयोग  दारूडे दारू पिण्यासाठी करीत आहेत .सध्या  अन्नपुरवठा निरीक्षक बोर्डे यांची ड्युटी लागलेली आहे.त्यांना गोडाऊन मध्ये फाटक तुटलेले दिसू नये या बद्दल आश्च्छर्य व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments