विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थेचे पालन करून समाजाला प्रेरित करावे तसेच प्रत्येक शाळेमध्ये आर एस पी सारखे उपक्रम राबवावेत- ठाणेदार पांडव
हिवरखेड(प्रतिनिधी) बाळासाहेब नेरकर कडुन
पोलीस स्टेशन हिवरखेड व सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वर्धापन दिन निमित्त सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.अनिलकुमार भोपळे, उद्घाटक हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार श्री.गोविंद पांडव,प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह श्री.श्यामशील भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे,पत्रकार श्री.गोवर्धन गावंडे,निर्भया पथकाच्या प्रा.दुर्गाताई बोपले व श्रीमती मधुबाला शर्मा तसेच संवाद पालक संघाचे सतीशजी इंगळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. या सप्ताहाचे औचित्य साधून ठाणेदार श्री.पांडव यांच्या हस्ते तक्रार पेटीचे उद्घाटन करण्यात आले.पोलीस वर्धापन दिनानिमित्त उपस्थित पोलीस बांधव व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री.अनिलकुमार भोपळे यांनी समाजात शांतता व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी पोलिस विभाग अविरत कार्य करीत असतो.त्यांची कार्यप्रणाली या सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी,असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या सप्ताहाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणच्या (आरएसपी) विद्यार्थ्यां पथकाच्या रॅलीचे भोपळे विद्यालयापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत आयोजन करण्यात आले होते. आरएसपी पथकाच्या रॅलीचा समारोप पोलीस स्टेशन येथे झाला. या समारोपीय कार्यक्रमात ठाणेदार श्री.पांडव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी वाहतुकीचे नियम, रहदारीचे नियम, कायद्यांचे ज्ञान व संपूर्ण पोलीस स्टेशनचे कामकाजाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाकरिता जिल्हा समादेशक डॉ. मयूर लहाने यांच्या मार्गदर्शनात तसेच हिवरखेड पोलीस स्टेशन व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आले. रस्त्यावरील वाहनांना रेडियम लावून रात्रीला होणाऱ्या अपघाताला रोखण्यासाठी समुपदेशित करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचा संपूर्ण स्टाफ यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.मयूर लहाने तर आभार प्रदर्शन प्रशांत भोपळे मानले. आर एस पी च्या पथकाच्या पथ संचलन गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे होते तसेच रस्त्यावरील वाहन चालकांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या कामगिरीला प्रतिसाद दिला.
0 Comments