प्रतिनिधी जळगांव (जा):-दिनांक ९/१/२०२४ रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पळशी सुपो येथे अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षांपासून पळशी सुपो येथील नदीवरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून रेंगाळत आहे. परंतु श्रीक्षेत्र पळशी सुपो येथील सुपोजी महाराज यात्रा पळशी सुपो येथे मोठ्या प्रमाणात सुरू होणार असून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनाससाठी येत असतात परंतु पुलाशेजारी भला मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आला आहे तसेच पुलाच्या संरक्षण भिंतीचे सुद्धा काम अर्धवट ठेवण्यात आले ते काम ते अर्धवट काम येत्या रविवार पर्यंत या पुलाच्या संरक्षण भिंतीचे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करावे तसेच या अर्धवट कामांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. तसेच या संदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यास येत्या १३/०१/२०२४ शनिवारी रोजी ११ वाजता पळशी सुपो येथे वंचित बहुजन आघाडी व समस्त गावकरी नागरिकांच्या वरीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद आहे निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक अरुणभाऊ पारवे, तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे,शहर अध्यक्ष आजम कुरेशी,श्रीराम भिडे, सुपडा बांगर, शहर संघटक अमोल तायडे, नितीन वानखडे सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments